Krishna Bhajan | कृष्ण भजन
🙏केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा🙏
केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा
तुझा सारखा तूच देवा तुला कुणाचा नहीं हेवा
वेडो वेडी संकटातुनि काढशी माधवा
केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा
वेडा होवूनी भक्ति साठी गोप गड्यासह यमुने काठी
नंदा घरचा गायी हाकिशी गोकुड़ी यादवा
केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा
वीर धनुर्धर पार्था साठी चक्र सुदर्शन घेउनी हाती
रथ हांकुनिया पाण्डवाचा पड़विशी कौरवा
केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा

Comments
Post a Comment